सांगोला येथे डॉ परेश खंडागळे यांच्या वाढदिवसा निमीत रक्तदान शिबीराचे आयोजन.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला येथील आनंद हॉस्पिटलचे डॉ परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आनंद हॉस्पिटलमध्ये 9 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.
पुढे तसे होऊ नये म्हणून आपण आधीच रक्त संकलन करून ठेवणे गरजेचे आहे. अनेक रुग्णांना वेळेवरती रक्त न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आम्ही समाजाचे देणे लागतो या भावनेतून आनंद हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आसल्याची माहिती डॉ परेश खंडागळे यांनी दिली. रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आव्हान डॉ अमर शेंडे, डॉ परेश खंडागळे, डॉ स्वाती खंडागळे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment