Recent Tube

Breaking

Tuesday, July 25, 2023

मणिपूर राज्यातील 'त्या' नराधमांना फासावर लटकवा ; सांगोला काँग्रेस तालुका कमिटीची मागणी



मणिपूर राज्यातील 'त्या' नराधमांना फासावर लटकवा ; सांगोला काँग्रेस तालुका कमिटीची मागणी 


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


मणिपूर राज्यात आदिवासी महिलांना भररस्त्यात नग्न करुन धिंड काढत सामूहिक बलात्कार करणाऱ्या 'त्या' नराधमांना फासावर लटकवा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी सांगोला तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने केंद्र सरकार यांचेकडे केली आहे. यासंदर्भात सांगोला तहसीलदार मा.खडतरे साहेब यांच्यामार्फत मंगळवारी निवेदन पाठविण्यात आले आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन आदिवासी महिलांची भररस्त्यात नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या संतापजनक घटनेचा सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अभिषेक भैय्या कांबळे तालुका कार्याध्यक्ष चाँदभैय्या शेख , तालुका उपाध्यक्ष अक्षय महानुणी ,तालुका उपाध्यक्ष  संतोष ऐवळे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीच्या वतीने  जाहीर निषेध व्यक्त करीत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे.

स्त्रीला “देवी “म्हणून पुजा करणाऱ्या आपल्या भारत देशात सुमारे 70 दिवसांपासून मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. देशाची राजसत्ता उपभोगत जगभर डंका पिटनारे मोदी सरकार मात्र हातावर हात ठेऊन बसले आहेत .भारतात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत त्यांच्यावर सतत अत्याचार आणि जीवघेणे हल्ले होत आहेत. ज्या लोकांचा मतांवर आपण सत्ता उपभोगत आहात, ज्यांच्या टॅक्सच्या पैशावर हा देश चालतो, त्या लोकांची जर आपण रक्षा करू शकलो नाही, तर हे आपण चालवत असलेल्या शासनाचे अपयश आहे, अशा प्रकारे शासन करणाऱ्या चालविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. या आंदोलनास तालुका संघटक विनोद वाघमारे,धनाजी साठे ,समाधान ऐवळे ,लखन साठे ,वैभव साठे ,दिपक कांबळे ,सुभाषराव गेजगे, भारत घाडगे ,अक्षय लोखंडे   पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment