भाजपच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.परेश खंडागळे यांची निवड करण्याची एक मुखी मागणी.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
रिक्त असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध डॉ.परेश खंडागळे यांची निवड करण्याची भाजपाच्या कार्यकर्त्यातून एक मुखी मागणी होत आहे. डॉ.परेश खंडागळे हे सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झगडत आहेत.
सांगोला तालुक्यामध्ये डॉ परेश लक्ष्मणराव खंडागळे हे रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत.डॉ परेश खंडागळे हे युवकांच्या गळ्यातील ताईत असल्यामुळे व वैद्यकीय सेवेमध्ये सलग 10 ते 15 वर्षे काम करीत आहेत. अनेक गोरगरीब रुग्णांवर त्यांनी मोफत उपचार व मोफत शस्त्रक्रियाही केले आहेत.
भा ज प च्या चिन्हावर पंचायत समिती व ग्रामपंचायत पॅनल निवडणूक लढवली आहे. डॉ. परेश खंडागळे यांचे सांगोला तालुक्यामध्ये युवकांचे मोठे संघटन आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सांगोला शहर व तालुक्यातील जनतेतून भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
डॉ.परेश खंडागळे हे मन मिळावू स्वभावाचे आहेत. भविष्यात सांगोला तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. परेश खंडागळे यांना संधी मिळाल्यास ते भारतीय जनता पार्टीचे विचार व कार्य घराघरापर्यंत पोहोचवतील त्यांनी आत्ता पर्यंत सामाजिक् वैद्यकीय राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी विविध प्रकारची शिबिरे त्यांनी आत्ता पर्यंत आयोजित केली आहेत.
त्याचबरोबर ते नामांकित डॉक्टर म्हणून ओळखले जातात. व सुरुवातीपासून त्यांनी भारतीय जनता पार्टीचे काम प्रामाणिकपणे केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी त्यांना संधी द्यावी अशी मागणी सांगोला तालुक्यातून होत आहे.


No comments:
Post a Comment