सरकारने केलेली दुध दर वाढ फसवी - डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने पशुपालक- शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.. राज्यांमध्ये सुध्दा अनेक संघटनांनी दुध दरवाढीसाठी वेगवेगळ्या भागांमध्ये आंदोलने केली... त्याची दखल घेऊन राज्य सरकारने दुधदरवाढ करण्यासाठी एक समिती गठीत केली...व त्या समितीचा अहवाल आला असेल म्हणूनच राज्यसरकारने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला...दुध दरवाढ होणार म्हटल्यावर पशुपालक -शेतकरी आनंदात होता परंतु ही दुध दर वाढ फसवी असल्याने सर्वांच्या आनंदावर पाणी फिरले आहे...
सध्या ३.५/८.५ फॅट असलेल्या दुधाला ३२/-रुपये दर मिळत आहे..तो दर वाढवुन ३४/-रुपये करण्यात आला आहे...परंतु खरी मेख तर पुढे आहे..एकतर १पाॅंईट फॅट कमी लागली तर २० पैसे कमी व्हायचे म्हणजे लिटरला १/-रुपया कमी व्हायचा आता नवीनच शक्कल लढवली आहे..१पाॅंईंट फॅट कमी लागली तर १/-रुपया कमी होणार आहे.. म्हणजे लिटरला ५/-रुपये कमी होणार आहेत...तसेच वाहतुक व कमिशन २/-रुपये होते ते १-५०/-पैसे कमी करण्यात आले आहे..
त्यांना ही माहीत आहे की साधारणता कोणत्या मौसमात फॅट किती लागते फॅट तर कमी अधिक होतच असते परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार जी फॅट आहे ती अत्यंत कमी दुधाला दिसुन येते ... म्हणजे यांनी दरवाढीचे गाजर दाखवले व जे करायचे ते केले..यांना दुध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांचे हित नको आहे त्यांना दुध धंद्यातील मोठमोठ्या उद्योग पतीचे हित महत्वाचे वाटत आहे.
एकतर पाऊसाचा लहरी पणा ..पिके नाहीशी झाली आहेत..व कसाबसा शेतकरी दुध व्यवसायाकडे वळाला असताना पुंन्हा दुधाची दर वाढ नियोजन पध्दतीने रोखुन पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणण्याचे काम सरकारने केले आहे...
सरकारने लवकरात लवकर आशा कठीण नियमांच्या जोखडातुन दुध व्यवसायीकांना बाहेर काढुन खर्चाच्या आधारावर ती गायीच्या दुधाला ४०/-रुपये प्रती लिटर दर द्यावा...व तुमच्या फॅटचा ...कमीशन कमी करण्याचा जो प्रकार आहे तो ताबडतोब बंद करावा...तुमचे दुध दरवाढीचे जे फसवे गाजर आहे ना..ते सर्वांच्या लक्षात आले आहे... येणाऱ्या काळात दुध दरवाढीसाठी शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व पशुपालकांना न्याय देण्यासाठी रस्तावर उतरण्याचा इशारा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी दिल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली


No comments:
Post a Comment