Recent Tube

Breaking

Friday, July 21, 2023

सांगोला युवक काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी फिरोजभाई मणेरी तर युवक काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी तुषार माने यांची निवड



सांगोला युवक काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी फिरोजभाई मणेरी तर युवक काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी तुषार माने यांची निवड. 


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला युवक काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी युवा आणि धडाडीचे नेतृत्व फिरोजभाई मणेरी तर युवक काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी तुषार माने यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सुनंजयदादा पवार व  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी प्रांतिक सदस्य प्रा. पी. सी. झपके सर, मार्गदर्शक सुनील भोरे सर , विधानसभा युवक  अध्यक्ष अजितदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या निवडी पार पडल्या. 

 या निवडी प्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

   सांगोला शहर आणि उपनगरामध्ये काँग्रेस पक्ष वाढीसाठी नवनिर्वाचित युवक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष फिरोजभाई मनेरी यांचे योगदान मोलाचे आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. संघटन वाढवण्यासाठी त्यांचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर काम करत असताना सत्ताधाऱ्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. पडद्याआड ची भूमिका बजावत असताना पक्षाची बाजू सक्षम पणे मांडून काँग्रेस पक्ष हाच उज्वल भविष्य घडवणारा पक्ष असल्याचे ठामपणे सांगितले. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर देशाचे नेते राहुलजी गांधी तसेच पक्षाचे पदाधिकारी यांचे विचार प्रसार माध्यमातून पोहोचवून त्यांनी काँग्रेस पक्षासाठी मोठी कसरत केली आहे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन सांगोला युवक काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी युवा आणि धडाडीचे नेतृत्व फिरोजभाई मणेरी तर युवक काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी तुषार माने यांची सर्वांमते निवड करण्यात आली आहे.

   शहरात पक्ष वाढवण्यासाठी योग्य निवड झाली म्हणून राजकीय सामाजिक पक्षातून तसेच विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

चौकट

काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सोनियाजी गांधी, मा. खा. राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, आम. प्रणितीताई शिंदे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्रीनिवास बि व्ही, युवक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व प्रा. पी. सी. झपके सर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शहर व उपनगरात ठीक ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या शाखा स्थापन करून, शहरात युवा संघटन वाढवणार आहे. मा. फिरोज मणेरी 

शहराध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी

No comments:

Post a Comment