Recent Tube

Breaking

Thursday, July 20, 2023

सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांचीधडाकेबाज कारवाई.



सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांचीधडाकेबाज कारवाई. 


तालुक्यात कुठेही वृक्षतोड होत , प्राण्याची शिकार होत असेल तर माझ्याशी संपर्क करा तुकाराम जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला येथील वनपरिक्षेत्र आधिकारी विजय बाठे यांची बदली झाली असून तुकाराम जाधवर यांनी पदभार स्वीकारला आहे. जाधवर यांनी पदभार स्वीकारताच ४ जुलै ते १६ जुलैपर्यंत विविध ठिकाणची वृक्षतोड, वृक्षतोड करून साठवलेले लाकूडसाठा, कोळसा वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.

 २ आठवड्यातच तब्बल ८ ठिकाणी कारवाई करुन १८८ घन मीटर जळाऊ लाकूड व ८५ नग इमारती लाकूड (१७. २१६ घन मीटर) असे तर अवैद्य कोळसा वाहतुकी करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करत ३१० पोती कोळसा जप्त केला आहे. 

महसूल विभाग असो किंवा पोलीस या कार्यालयामध्ये विविध कामासाठी मोठी गर्दी असते. ही कार्यालये सतत नागरिकांनी गजबजलेलीच असतात. 

परंतु पर्यावरण दिनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेल्या वनविभागाच्या कार्यालयाकडे शक्यतो कोणी नागरिक फिरकताना दिसत नाहीत.परंतु  कार्यालयात संवेदनशील व कर्तव्यनिष्ठ अधिकारी असला की काय होते याची प्रचिती सध्या वनविभागाच्या कार्यालयाकडे पाहून सांगोल्यात येऊ लागली आहे.

वन विभागाचे कार्यालय सांगोल्यात आहे की नाही असे वाटत होते. परंतु काही दिवसापूर्वीच रुजू झालेले तुकाराम जाधवर यांनी सांगोला वन विभागाचा पदभार स्वीकारताच 

आपल्या अधिकाराचा वापर करून अवैध वृक्षतोड, वृक्षतोड केलेल्या साठा, कोळसा निर्मिती व वाहतूक यावर कारवाई सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी ४ जुलै २०२३ रोजी पदभार स्वीकारताच १६ जुलै पर्यंत विनापरवाना वृक्षतोड व वाहतुकीवर ७ तर अवैद्य कोळसा वाहतूक करणाऱ्या  १ असे एकूण ८ जणांवर कारवाई केली आहे.

महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ सुधारणा कायदा १९८९ कलम ३ ब नुसार वनविभागाचा वृक्ष तोड परवाना न घेतल्याने महूद येथील अशोक दत्तात्रय कांबळे आंबा व लिंब जळाऊ लाकूड १६ घनमीटर, रॉयल बेकरी, 

सांगोला अफजल ताज महमंद खान यांचे लिंब जळाऊ ६६ घन मीटर, लाकूड,महूद येथील विजय ज्ञानोबा दिक्षित लिंब जळाऊ ३ घनमीटर लाकूड, हटसन अग्रो प्रा. लि. चांडोलेवाडी, 

सांगोला ७० घन मीटर, गोपाळ लधाराम पटेल यांचे विजय शंकर सॉ मिल, सांगोला जळाऊ ६ घन मीटर, लिंब इमारती नग ३, जवळा येथील सिकंदर कमरूद्दिन इनामदार यांच्या इनामदार सॉ मिल कारवाई करून लिंब इमारती 

नग ३७ (६.३५५ घन मीटर),जांभूळ नग ३, जवळा येथील धनेश सदाशिव सुतार यांच्या दत्त सॉ मिलवर कारवाई करून लिंब इमारती नग ४२ (९.३५८ घन मी), लिंब जळाऊ लाकूड २७ घन मीटर असु एकुण १८८ घन मीटर व ८५ इमारती लाकूड (१७.२१६ घन मीटर) कारवाई केली आहे.

तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ४१ ब २ नुसार अवैध लाकूड वाहतूक एम. एच ४५, ए. एफ ६३६८ या वैद्य कोळसा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करीत १ लाख २० हजार रुपये किंमतीचा ३१० पोती कोळसा जप्त केला आहे.

ही कारवाई उप वनसंरक्षक धैर्यशील पाटील व सहाय्यक वन संरक्षक बी. जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर, वनपाल एस. एल. मुंडे, वनपाल एस. एल. वाघमोडे, वनरक्षक जी. बी. व्हरकटे, आर. बी. कवठाळे, ए. के. कारंडे, व्ही. पी. इंगोले व वाहन चालक आर. एस. बिनवडे यांनी केली आहे.

तालुक्यात कुठेही वृक्षतोड होत असेल, प्राण्यांची शिकार होत असेल तर सांगोला वन विभागाशी किंवा थेट माझ्याशी संपर्क  साधावा निश्चितपणे कारवाई केली जाईल - तुकाराम जाधवर, वनपरिक्षेत्र आधिकारी, सांगोला.

No comments:

Post a Comment