Recent Tube

Breaking

Tuesday, July 18, 2023

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयासमोर जोडो मारो आंदोलन संपन्न



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयासमोर जोडो मारो आंदोलन संपन्न.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महिलांशी छळवणूक करून लैंगिक शोषण केले चा व्हिडिओ सर्वत्र प्रसिद्ध झालेला आहे. त्याचे पडसाद चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात उमटलेले दिसून येत आहेत.

त्याच्या निषेधार्थ सांगोला तहसील कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी  2 वाजता किरीट सोमय्या यांच्या फोटोस जोडो मारो आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात आले.

या आंदोलनाचे निवेदन सांगोला तहसील कार्यालयाचे तहसीलदार संजय खडतरे यांना देण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख सूर्यकांत नाना घाडगे, शहर प्रमुख कम्रद्दीन खतीब, उप तालुकाप्रमुख अरविंद पाटील, नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेले हरिभाऊ पाटील, शिवसेना विभाग प्रमुख रघुनाथ ऐवळे, तुषार इंगळे, चिंचोली गावचे माजी सरपंच कृष्णा बेहेरे, अनिल बेहेरे, व असंख्य शिवसैनिक  उपस्थित होते या आंदोलनाच्या निषेधार्थ हरिभाऊ पाटील सूर्यकांत नाना घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment