Recent Tube

Breaking

Monday, July 17, 2023

छावण्यांची थकीत बिले ताबडतोब अदा करावीत..व जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी.



छावण्यांची थकीत बिले ताबडतोब अदा करावीत..व जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


 गेले अनेक वर्षांपासून जनावरांच्या छावण्याची थकीत बिले जवळ जवळ 22कोटीच्या घरात असुन  छावणीचालकांना सदर थकीत बिले ताबडतोब देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख व युवा नेते अनिकेत देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेद्र फडणवीस यांच्या कडे करण्यात आली...

    सध्या पाऊसकाळ लांबलेला  आसुन पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे गेले एक ते दोन‌ वर्षे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुठलीही पिके नाहीत.. ज्या शेतकरऱ्यांनी कष्टाने कसीबसी आपली पिके जतन केली आहेत त्या शेतकऱ्यांना केलेल्या खर्चाएवढे सुध्दा पैसे हातात येत नाहीत.आशा परिस्थितीत अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांने दुध व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित केले असताना काही प्रमाणात शेतकरी- पशुपालकांना दिलासा मिळाला होता..अशातच अचानक दुधाचे दर कमी करण्यात आले..आणि पुंन्हा शेतकरी-पशुपालक अडचणीत सापडला आहे...

   आशा अडचणीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे.आज मितीला तरी पाऊस सुरू झालेला नसुन.काही दिवसांत पाऊस सुरु झालाच तरी लगेचच चारा निर्माण होणार नाही.या ही बाबींचा गांभीर्याने सरकारने विचार करावा तसेच चारा छावण्याची थकीत बिले ताबडतोब देण्यात यावीत व जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता करुन देण्याची मागणी डॉ भाई बाबासाहेब देशमुख व डॉ अनिकेत देशमुख यांनी केल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

No comments:

Post a Comment