Recent Tube

Breaking

Tuesday, July 11, 2023

डॉ परेश खंडागळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा



डॉ परेश खंडागळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 

रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील नामवंत डॉ परेश खंडागळे यांचा वाढदिवस 9 जुलै 2023 रोजी विविध उपक्रमांनी आनंद हॉस्पिटल सांगोला येथे डॉ परेश खंडागळे यांचा फेटा, तुळशी हार, शाल घालून व केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



डॉ परेश खंडाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले व अल्प दरामध्ये रुग्णांवरती विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच शाहू फुले आंबेडकर निवासी अनिवासी गुरुकुल उदनवाडी व आश्रम शाळा,अनाथ आश्रम व वृद्धा आश्रम येथे 50 किलो गहू व 50 किलो तांदूळ तेलाचा डबा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.



डॉ परेश खंडागळे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरिबांना मदत करून व रुग्णांवरती अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया करून साजरा केल्यामुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांकडून त्यांच्यावरती शुभेच्छाचा वर्षा होत आहे.

No comments:

Post a Comment