बहुजन समाज पार्टी सांगोला विधानसभा युनिटची नूतन कार्यकारणी जाहीर.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी दिनांक 26 जून 2023 रोजी सांगोला भिम नगर येथील बुद्ध विहारांमध्ये बहुजन समाज पार्टीची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये सांगोला विधानसभेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
तत्पूर्वी आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची 149 वी जयंती साजरी करण्यात येऊन राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना सांगोला बसपा युनिट यांचे कडून विनम्र अभिवादन करण्यात आले या बैठकी मध्ये नूतन विधानसभा अध्यक्ष म्हणून कालिदास कसबे उपाध्यक्ष संतोष खडतरे महासचिव अॅड सागर बनसोडे बी व्ही एफ संयोजक अमर सोनवले विधानसभा कोषाध्यक्ष विकास वाघमारे बामसेफ संयोजक अॅड आनंद बनसोडे तसेच महिला आघाडीच्या विधानसभा अध्यक्ष म्हणून सौ अलका बनसोडे विधानसभा उपाध्यक्ष सौ मीना बनसोडे यांच्या निवडी करण्यात आल्या.
या निवडी महाराष्ट्राचे प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे महासचिव विलास शेरखाने जिल्हाध्यक्ष भालचंद्र कांबळे जिल्हा प्रभारी योगेश गायकवाड अशोक ताकतोडे साहेब जिल्हा बामसेफ संयोजक एल एस सोनकांबळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडल्या.
यावेळी मा जिल्हा सचिव कुंदन बनसोडे मा जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे अमोल बनसोडे राजू माने माजी नगरसेविका रेश्मा ताई बनसोडे जयंती बनसोडे शिरीष शिंदे श्रीकृष्ण प्रक्षाळे कुमार गडहिरे सुरेश शिंदे व इतर आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते महिला असंख्य संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment