Recent Tube

Breaking

Wednesday, June 28, 2023

वाकी विद्यालयाचा टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी वारी निमित्त दिंडीचा सोहळा संपन्न



वाकी विद्यालयाचा टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी वारी निमित्त दिंडीचा सोहळा संपन्न.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


विद्यामंदिर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वाकी शिवणे या विद्यालयात आज आषाढी वारी निमित्त दिंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यालयातील सर्व विद्यार्थी वारकरी वेशामध्ये दिंडीत सामील झाले होते.

मुलांनी पांढरा शर्ट व धोती किंवा पँट घातली होती मुलींनी साडी तुळशी वृंदावन घेतले होते.सकाळी 8 वाजता दिंडी  मार्गस्थ झाली. टाळ मृदंगाच्या गजरात विद्यार्थी दंग झाले होते अर्णव व ईश्र्वरीच्या रुपात साक्षात विठ्ठल रुकमाई  पंढरीतून वाकी नगरीत दाखल झाले. शाळेपासून दिंडी निघाली व रांगेत गावात  दाखल झाले. मारुती मंदिरासमोर काही विद्यार्थी फुगडी खेळण्यात दंग झाले.

प्रशालेचे मुख्याध्यापक रेवण औताडे सर प्राथमिक चे मुख्याध्यापक विजय नवले सर यांनी दिंडीचे उत्कृष्ठ नियोजन केले प्रशालेतील शिक्षक हेगडे सर कदम सर येलपले सर घुले सर जरे सर काकडे सर रोकडे सर राजगुरू सर पवार सर कुंभार सर खंडागळे सर काटकर सर काटकर मॅडम होवाळ मॅडम  दिंडीत सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment