Recent Tube

Breaking

Saturday, May 13, 2023

कर्नाटकात कॉंग्रेसचा विजय; सांगोल्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

 

कर्नाटकात कॉंग्रेसचा विजय; सांगोल्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष


सांगोला- (प्रतिनिधी)कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्यामुळे सांगोल्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगोला शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज  चौकामध्ये फटाके फोडून लाडू चे वाटप करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयउत्सव साजरा करण्यात आला.

कर्नाटकाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे सांगोला तालुका काँग्रेस कमिटी,महा  विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते , काँग्रेस पार्टीचे जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने विजय उत्सव साजरा करण्यात आला.

सांगोला शहरातील शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले , पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला,

यावेळी सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष मैनाताई बनसोडे,भारत मोरे (शिवसेना तालुका समन्वयक) शिवसेना शहर प्रमुख कमरूद्धीन खतीब, रघुनाथ ऐवळे (सांगोला विभाग प्रमुख) ,अजित गोडसे, नितीन चव्हाण, शिवसेना युवा नेते तुषार इंगळे, अमर साळुंखे, शेखर गडहिरे, अभिजीत कांबळे, सिद्धेश्वर देशमुख, आकाश वाघमारे, गणेश लोखंडे, बंटी कांबळे अविनाश कांबळे, संजय शिंदे टीपू काझी, अक्षय रणदिवे सुरज कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment