Recent Tube

Breaking

Thursday, May 18, 2023

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन



वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 21 ते सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सांगोला एसटी स्टँड समोर वेदांत मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये अस्थिरोग विभाग, बालरोग विभाग सर्जन व मूत्ररोग विभाग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, मेडिसिन विभाग या सर्व प्रकारच्या आजारावरती मोफत उपचार करण्यात येणार आहे.

ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे अशा रुग्णांवरती होणारी शस्त्रक्रिया वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यांच्या माध्यमातून मोफत करण्यात येतील.

सांगली मिरज सोलापूर कोल्हापूरला होणारी मोठं मोठी गुंतागुंतीची ऑपरेशन सांगोल्यामध्ये तज्ञ डॉक्टर्स व सुपर स्पेशालिस्ट सर्जन यांच्या देखरेखीखाली वेदांत हॉस्पिटलमध्ये होत आहेत. तरी सांगोला तालुक्यातील सर्व गोर गरीब रुग्णांनी व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment