Recent Tube

Breaking

Friday, May 26, 2023

वाकी शिवणे विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे एच एस सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश



वाकी शिवणे विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे एच एस सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश


रणसंग्राम न्युज संपादक नितीन हेवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे विद्यामंदिर जूनियर कॉलेजचे एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल गुरुवार दिनांक 25 मे 2023 रोजी ऑनलाइन जाहीर झाला. या निकाला मध्ये वाकी शिवणे विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील इयता बारावी विज्ञान शाखे मधील प्रथम क्रमांक येलपले सागर अरविंद-  87.17% , द्वितीय क्रमांक कोळेकर उत्कर्ष संभाजी- 81.50% , तृतीय क्रमांक देशमुख ऋतुजा अजित - 80.33%  व हेगडे ऋतुजा दिगंबर - 80.33% मिळवून प्रथम तीन क्रमांकामध्ये येण्याचा मान या विद्यार्थ्यांनी मिळविला.

तसेच या परीक्षेसाठी 113 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 110 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाकी शिवणे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

या निकालामुळे विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका यांचे वाकी शिवणे गावातील नागरिकांमधून व पालकांमधुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment