शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार दिनांक 25 मे 2023 रोजी ऑनलाइन जाहीर झाला. या निकालामध्ये शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बारावी कला शाखेतील एकूण 52 विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये कुमारी अवताडे योगिता संतोष हिने - 77.67% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर कुमारी जानकर ऋतुजा उद्धव हिने -72.33% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तर कुमारी अवताडे स्वाती तानाजी हिने - 70.83% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला.
व तसेच विज्ञान शाखेत एकूण 96 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते सर्वच 96 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून विज्ञान शाखेत कुमारी गडदे साक्षी बंडू हिने - 75.67% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर कुमारी जानकर प्रज्ञा वामन व कुमारी इंगोले सृष्टी दिलीपकुमार - 75.17% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर कुमारी पवार साक्षी अण्णा व श्री माने ज्ञानेश्वर नागू यांनी 75% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे. या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्राचार्य, सुपरवायझर सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
या शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षकांचे शिवणे गावातील पालकांकडून व नागरिकांकडून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


No comments:
Post a Comment