सांगोला येथील सुभव करिअर अकॅडमीचे यश
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील सेवानिवृत सहाय्यक पोलिस आयुक्त भरत शेळके यांच्या सुभव करिअर अकॅडमीचे 18 विद्यार्थी मुंबई पोलीस दलात भरती झाले आहेत.
या पोलीस भरतीमध्ये अतिशय गरीब कुटुंबातील व शेतकऱ्यांची मुले भरती झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून आनंदाचे व उत्साहाचे वातावरण झाले आहे.
सुभव करिअर अकॅडमी चे संस्थापक भरत शेळके साहेब व या अकॅडमीचे प्रशिक्षक तानाजी बनसोडे व त्यांना साथ देणारे शिक्षक विजय राऊत, प्रताप सुरवसे, विठ्ठल कदम यांचे तालुक्यातील पालकांकडून, सर्व जनतेकडून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


No comments:
Post a Comment