Recent Tube

Breaking

Tuesday, May 2, 2023

मातोश्री वृद्धाश्रम व आपुलकी प्रतिष्ठानकडून कामगार दिनानिमित्त पालावरील मुलांना कपडे वाटप



मातोश्री वृद्धाश्रम व आपुलकी प्रतिष्ठानकडून कामगार दिनानिमित्त पालावरील मुलांना कपडे वाटप


सांगोला ( प्रतिनिधी )- मातोश्री वृद्धाश्रम व आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पालावर राहणाऱ्या  ३२ लहान मुलामुलींना नवीन कपडे व ९ महिलांना साड्या वाटप करण्यात आले.

सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठान व वृद्धांचा सांभाळ करणाऱ्या सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन व कामगार दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त वासुद रोड, सांगोला येथील पाण्याच्या टाकीजवळ पालं टाकून राहणाऱ्या गरीब कुटुंबातील ३२ लहान मुला-मुलींना नवीन कपडे तसेच नऊ महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.

यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव मातोश्री वृद्धाश्रमाचे अध्यक्ष राहुल जाधव, सचिव अशोक जाधव, आपुलकीचे सचिव संतोष महिमकर, हरिभाऊ जगताप, प्रा. विधिन कांबळे, महादेव दिवटे, प्रमोद दौंडे, श्रीपती आदलिंगे, विजय म्हेत्रे, जितेंद्र बोत्रे, दादा खडतरे, अच्युत फुले, शिवदास राऊत, सुरेश चौगुले, प्रसन्न कदम, दत्तात्रय दौंडे सुनील मारडे, अमर कुलकर्णी, रविंद्र कदम आदिसह पालवरील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment