वाकी शिवणे विद्यामंदिर प्रशालेचे स्पर्धा परीक्षेमध्ये यश
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
12 फेब्रुवारी 2023 रोजी घेतले गेलेल्या पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल 29 एप्रिल 2023 रोजी झाला. या परीक्षेमधील इयत्ता पाचवीतील कुमारी तनवी संतोष सिद 228 गुण, कुमार विरल भारत चव्हाण 168 गुण दोन विद्यार्थी पात्र तसेच इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षा मधून कुमारी समृद्धी सुनील दनके तसेच कुमारी सायली दादासो घाडगे 160 गुण
एन एम एम एस परीक्षेमधून इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी दनके समृद्धी सुनील 110 गुण, यादव विशाल विजय 105 गुण, बाबर सिद्धनाथ रामचंद्र 78 गुण, गायकवाड मयुरी महावीर 84 गुण, घाडगे सायली दादासो 104 गुण वरील एन एम एम एस परीक्षेत विद्यार्थी सारथी संस्था स्कॉलरशिपसाठी पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्याचे संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने एक झाड देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक रेवन अवताडे सर, कदम सर, जरे सर, येलपले सर, नवले सर, सिद सर, राजगुरू सर, हेगडे सर, ढेरेसर, काकडे सर, खंडागळे सर, फाळके सर, कुंभार सर, कारंडे मॅडम, साबळे मॅडम, काटकर मॅडम, व पालक आरूण दनके, राम बाबर, सुनिल दनके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे गावातील नागरिकांकडून प्रशालेच्या सर्व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


No comments:
Post a Comment