सांगोला येथे 3 जून रोजी "संविधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषद'
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला (प्रतिनिधी )देशात गेल्या काही वर्षापासून एक अस्वस्थेचे वातावरण आहे. संविधानाचा सोयीचा अर्थ लावून किंवा काढून या देशातील न्याय व्यवस्थेपासून ते घटनात्मक सर्वच संस्थांवर सत्ताधारी पक्षाने कब्जा मिळविला आहे. या संस्था सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्या प्रमाणे काम करीत आहेत, त्याविरोधातील संविधानवाद्यांचा व लोकशाहीवाद्यांचा व आवाज क्षीण झालेला आहे. सर्वत्र एक दहशत, भितीचे वातावरण आहे.
आता हा घाला भारतीय नागरिकांच्या संविधानिक मूलभूत हक्कांवरही घातला जाऊ लागला आहे. सेक्युलर तत्वाचा पुरस्कार आणि अंगिकार करणाऱ्या संविधानाने सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, राष्ट्राची एकात्मता आणि आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येक नागरीकाला धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. धर्मस्वातंत्र्यात धर्म निवडीचाही प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिला आहे. परंतु कुठे एखादी दुसरी गुन्हेगारी घटना घडली असेल त्याचे भांडवल करून लव्ह जिहाद अशा खोट्या सबबी पुढे करून आंतरधर्मिय विवाहावर बंदी घालण्यासाठी कायदे करण्याचे घाटत आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्रासह देशातील काही राज्यामध्ये धर्मांतरबंदीचा कायदा करण्यासाठी मोर्चे निघू लागले आहेत. धर्मांतरबंदीचा कायदा करून, नागरीकांच्या धार्मिक स्वातंत्र्यांवर घाला घालण्याचा हा डाय तर आहेत, परंतु आंतरधर्मिय विवाह परिवार समन्वय या नावाखाली राज्य सरकारने महिला व बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबर 2022 च्या शासन आदेशानुसार एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आंतरधर्मिय विवाहाला ही समिती मान्यता देणार अन्यथा हा विवाह बेकायदेशीर असणार आहे किंवा त्या विवाहाला मान्यता मिळणार नाही हा निर्णयही आधुनिक मुक्त जगातील तरुण मुला-मुलींना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकारावर गदा आणणारा आहे. आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचे मूलभूत व्यक्तिस्वातंत्रही हिरावून घेतले जात आहे. त्याहीपेक्षा या देशातील सामाजिक विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्यासाठी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती घडवून आणली, ती पराभूत करण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा करून धम्मक्रांतीचा पायाच उखडून टाकण्यासाठी दोन हजार वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रतिक्रांती घडवून आणण्याचे हे षडयंत्र आहे. म्हणून आता सावध होण्याची गरज आहे. ही काळाची हाक असून संविधानिक व लोकशाही मार्गाने भारतीय नागरीकांच्या घटनात्मक मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी पुढे यावे लागेल. या षडयंत्राच्या विरोधातील आवाज म्हणजेच आपली आयोजित करण्यात येत असलेली 'संविधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषद होय,
या परिषदेसाठी सेक्युलर मुव्हमेंट व सेक्युलर कार्ट मुहमेंटचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे (सांगली) (जेष्ठ विचारवंत, फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक ), मा. मधु कांबळे, जेष्ठ पत्रकार तथा सहसंपादक दै. लोकसत्ता मुंबई तसेच प्रा. डॉ. भरत नाईक (कोल्हापूर), जनरल सेक्रेटरी सेक्युलर मुव्हमेंट व इतर जेष्ठ मान्यवर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच विशेष सन्माननीय अतिथी म्हणून मा. डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना, मा. ललित बाबर, स्वराज इंडिया, मा. प्रदीप मिसाळ, सोलापुर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यासह इतर मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे.
यापूर्वीही सेक्युलर मुव्हमेंटच्या वतीने मुंबई, नागपूर, औरंगाबाद सांगली, कोल्हापूर या ठिकाणी परिषदा झाल्या आहेत. या परिषदांमध्ये अनेक समविचारी संघटना व अनेक विचारवंत सामील झालेले होते. सर परिषदेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये परिषद [व्हावी असे अनेकांनी मते नोंदविली म्हणून सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणून संविधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे.
"संविधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषद मध्ये सहभागी संस्था व संघटना
1) सेक्युलर मुव्हमेंट व सेक्युलर आर्ट मुहमेंट महाराष्ट्र राज्य 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, सांगोला, 3) संभाजी ब्रिगेड, सांगोला 4) भीमशक्ती संघटना, सांगोला 5) डॉ. आंबेडकर शेतीविकास व संशोधन संस्था, सांगोला 6) अस्तित्व संस्था, सांगोला 7) सांगोला तालुका मुस्लिम समाज 8) आखिल भारतीय होलार समाज संघटना, सांगोला 9) स्वाभिमानी होलार समाज संघटना, सांगोला 10) शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना, सांगोला (11) आदर्श नाभिक मंडळ, सांगोला 12) बहुजन क्रांती प्रतिष्ठान सांगोला 13) सांगोला तालुका पेन्शनर संघटना, सांगोला 14) समता प्रतिष्ठान, गुजेगाव 15) एन. डी. एम. जे. संघटना सांगोला 16) श्रीनाथ बहुद्देशिय संस्था, नंदुर 17) पुरोगामी युवक संघटना, सांगोला 18) सांगोला तालुका मातंग आघाडी 19) सांगोला तालुका डवरी गोसावी संघटना 20) शाहू फॉऊंडेशन, महुद 21) सुभव करिअर अकॅडमी (पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण), सांगोला
इत्यादी संस्था व संघटना सहभागी होणार आहेत.
दिनांक 3 जून 2023 दुपारी 3 वा
ठिकाण - पंचायत समिती बचत भवन, सांगोला


No comments:
Post a Comment