मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी शहाजी इंगोले तर कार्याध्यक्षपदी ब्रह्मदेव पवार यांची निवड
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
मराठा सेवा संघाच्या नूतन तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडीची बैठक दिनांक 27 मे 2023 रोजी दैनिक सांगोला नगरी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या निवडीसाठी तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी मा शहाजी इंगोले तर कार्याध्यक्षपदी मा ब्रह्मदेव पवार यांची व सचिवपदी मा अपुर्व थिटे यांची निवड करण्यात आली.
या निवडीसाठी मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष मा उत्तमराव माने शेंडगे, पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष मा तात्यासाहेब पाटील तर या निवडी प्रसंगी निरीक्षक म्हणून मा रवींद्र बापू पवार व मा वनिता कोरटकर हे पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडी वेळी माजी नगरसेवक मा सतीश भाऊ सावंत, मा रामभाऊ मिटकल शिवाजी गवळी प्रताप इंगोले, मा बापूसाहेब भाकरे, मा अशोक शिंनगारे, मा प्रताप देशमुख, मा बंडू निंबाळकर, मा संदीप गिड्डे, मा धनाजी शिकारे, मा बिरूदेव जावीर, मा रोहित शिकारी, मा वैभव शिकारे, मा धनाजी महाकाळ, मा विजय पवार व असंख्य मान्यवर उपस्थित होते. नूतन तालुकाध्यक्ष मा शहाजी इंगोले कार्याध्यक्ष मा ब्रह्मदेव पवार यांनी मनोगत व्यक्त करताना काम करण्याची संधी दिल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले. तसेच मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी योगदान देण्याचे आश्वासन दिले.


No comments:
Post a Comment