Recent Tube

Breaking

Saturday, March 4, 2023

कोळा नगरीत माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार



कोळा नगरीत माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांची नुकतीच पेट्रोन मधून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रयत सारख्या लोकप्रिय शिक्षण संस्थेत आपल्या हक्काचा माणूस नियुक्त झाल्याबद्दल सांगोला तालुक्यातील कोळा येथे आज रविवार दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता अर्जुन चौक कोळा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला आहे. संपूर्ण तालुक्याचे शक्तिपीठ असलेल्या 108 श्री श्री श्री रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा  आज नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार समारंभास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला अध्यक्षा स्वातीताई शिंदे पवार व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार लहू कांबळे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कोळा परिसरातील नागरिकांच्या सुख दुःखात साळुंखे पाटील परिवार नेहमीच सहभागी असतो. त्यामुळे या परिसराने नेहमीच आपल्या कुटुंबातील एक सदस्य याच नात्याने माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यावर निरपेक्ष भावनेने प्रेम केले आहे. याच प्रेमातून आज हा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. या सत्कार समारंभास कोळा व कोळा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment