महाविकास आघाडीचे रवींद्र धगेकर विजय झाल्याबद्दल काँग्रेसच्या वतीने पेढे वाटप
सांगोला : कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धगेकर विजयी झाल्याबद्दल सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास विलास पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आकाशबाजी करत पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सुनील भोरे, हरिभाऊ पाटील, सिद्धेश्वर काळे, फिरोज मणेरी, काशिनाथ ढोले, अजित चव्हाण, प्रशांत रायचुरे, प्रसाद खडतरे, नूर मनेरी, बाबुराव खंदारे, काळेल सर इत्यादी उपस्थित होते


No comments:
Post a Comment