Recent Tube

Breaking

Friday, March 24, 2023

सांगोला तालुक्यातील वंचित गावांचा टेंभू योजनेमध्ये समावेश



सांगोला तालुक्यातील वंचित गावांचा टेंभू योजनेमध्ये समावेश आमदार शहाजीबापू पाटील


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


विधानसभा निवडणुकीमध्ये शब्द दिल्याप्रमाणे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील एक ही गाव शेतीच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही. यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करून सांगोला तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या डोंगरगाव, मानेगाव, हणमंतगाव या गावांचा टेंभू योजनेमध्ये समावेश केला आहे.

सांगोला तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या हटकर मंगेवाडी गावातून टेंभू योजनेचा कॅनॉल जातो. गेल्या महिन्यामध्ये आमदार आपल्या दारी अभियानासाठी आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हटकर मंगेवाडी गावात गेले असता. मुख्य कॅनॉल जात असून शेतकऱ्यांना त्याचा कोणताही फायदा होत नसल्याचे तेथील नागरिकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.

मुख्य कॅनॉल हा उतारावरून गेला आहे. आणि लाभ क्षेत्रातील शेती चढावर असल्याने योजनेचा कोणताही फायदा होत नसल्याचे दिसून आले. यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन जत तालुक्यातील नवाळवाडी गावातून हटकर मंगेवाडी गावातील शेतीला पाणी मिळविण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या व 

सर्वेक्षणाच्या ठिकाणी स्वतः आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित राहात सर्वेक्षण करून घेतले 

यामध्ये हटकर मंगेवाडी गावाचा उर्वरित भाग गुनाप्पा वाडी, जुजारपूर, डोंगरगाव, मानेगाव, हणमंत गावच्या उर्वरित भागाला पाणी देण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी चालू केलेल्या प्रयत्नाला यश आले असून. या गावातील वंचित भागाला पाणी मिळणार असल्याने या गावातील शेतकऱ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण झाल्याचे दिसून येते

No comments:

Post a Comment