ज्योती क्रांती परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी विशाल गोडसे
सांगोला (प्रतिनिधी):- गोडसेवाडी ता. सांगोला येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विशाल मारुती गोडसे यांची ज्योती क्रांती परिषद, महाराष्ट्र राज्यच्या सांगोला तालुका अध्यक्ष म्हणून दिनांक २४ मार्च रोजीच्या बैठकीत निवड करण्यात आली.
यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रमेश बारस्कर ,जेष्ठ विचारवंत मच्छिंद्र भोसले, मा. जि.प.सदस्य अरुण तोडकर, जिल्हा उपाध्यक्ष माणिक पिसे ,विजय राऊत,अविनाश बनसोडे, रामदास म्हेत्रे यांच्या उपस्थितीत विशाल गोडसे यांची नूतन तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल नियुक्तीपत्र देऊन सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच सदरच्या बैठकीस संतोष टाकळे, सोमनाथ आदलिंगे, उमेश गोडसे, अक्षय आदलिंगे, अमित वाघमारे, विद्याधर बनसोडे ,कुलदीप आहेरकर ,हनुमंत खटके, बापू काळे, संराज आहेरकर आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment