Recent Tube

Breaking

Friday, February 24, 2023

कु. श्रीया कुलकर्णी तबला अलंकार परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण



कु. श्रीया कुलकर्णी तबला अलंकार परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण 


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


 सांगोला (प्रतिनिधी )- अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांचे मार्फत जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या तबला अलंकार परीक्षेत सांगोला येथील कु. श्रीया श्रीगणेश ( नितीन ) कुलकर्णी हिने प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन कोल्हापूर केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

तालमणी पंडित मनमोहन कुंभारे सर यांच्या रिदम अकॅडमी सांगली येथे गेल्या आठ वर्षापासून श्रिया कुलकर्णी तबल्याचे शिक्षण घेत आहे. इयत्ता चौथी पासूनच तबल्याची तिला आवड असल्याने तिने तबल्यातील उच्च शिक्षण घेण्याचा निश्चय करून अलंकार च्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे तिला "अलंकार" ही पदवी प्राप्त झाली आहे. अलंकार ही पदवी तबल्यातील पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी  आहे. श्रिया कुलकर्णी ही एम. एस्सी. (प्रथम श्रेणी ) असून सध्या शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये गणित विषयाचे अध्यापन करत आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment