शिवणे येथील गणपत बनसोडे यांचे अल्पशा आजाराने निधन
सांगोला (प्रतिनिधी) : शिवणे ता. सांगोला येथील गणपत बनसोडे यांचे काल सोमवारी दुपारी १:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ७४ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मागील १५ दिवसांपासून ते दम्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर सांगोला येथील खाजगी रुग्णालयानंतर , सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सांगली येथील उपचारानंतर १९ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज घेऊन ते घरी आले होते. २० फेब्रुवारी रोजी दुपारी १:३० वाजता निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.ते सुतार काम करीत असल्याने ते गणपत सुतार या नावानेही पंचक्रोशीत परिचित होते. शिवणे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० वाजता असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ते साप्ताहिक क्रांतीचिरागचे संपादक शशिकांत बनसोडे यांचे वडील होत.


No comments:
Post a Comment