महसूल प्रशासना विरोधात आरपीआयचे हालगी नाद आंदोलन.
अन्यथा मुंबई मंत्रालयासमोर आंदोलन : दिपक चंदनशिवे
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांना खडी, मुरूम, वाळू, क्रश सेंड आदी बिल्डिंग मटेरियल साहित्य मिळत नसल्याने अनेक शासकीय योजना तसेच अनुसूचित जाती वर्गातील नागरिकांच्या घरकुल योजनांची कामे बंद असल्याने अनेक नागरिक घरकुला पासून वंचित आहेत तर कामगारांना काम मिळत नसल्याने खडी, वाळू ,मुरूम उत्खननास तात्पुरती परवानगी द्यावी.
या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडी प्रदेश संघटक सचिव दीपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील समोर हलगी नाद आंदोलन व निदर्शने करण्यात आली.
याबाबतचे निवेदन पंढरपूरचे तहसिलदार यांना देण्यात आले.
याप्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संजय घोडके, संजय सावंत, मोहन ढवळे, संतोष सर्वगोड, सुधाकर माळी, दादा चव्हाण, लक्ष्मण कांबळे, कैलास कांबळे, अनिल माने, अण्णा कांबळे, भास्कर चंदनशिवे, प्रकाश बाबर, सचिन शेळके, सुनील चंदनशिवे, पिंटू कांबळे, समाधान दरोडे, राजेंद्र कोळी,रणजीत सरवदे, प्रकाश सोनवणे,बाळासाहेब आहेरकर,माया खरे, बाळासाहेब सर्वगोड एकनाथ वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र मुरूम, खडी, वाळू मिळत असल्याने सर्वत्र कामे सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र पंढरपूर शहर व तालुक्यात खडी क्रशर बंद असल्याने खडी, मुरूम, वाळू आधी बिल्डिंग मटेरियलचे साहित्य मिळत नसल्याने अनेक शासकीय योजना त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीच्या घटकातील नागरिकांचे घरकुलचे कामे रखडली असल्याने याचबरोबर मजुरांना हाताला काम मिळत नसल्याने महसूल प्रशासना विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयासमोर हलगी नाद आंदोलन आणि निदर्शने करून तात्काळ खडी क्रशर सुरू करण्यात यावीत, खडी, मुरूम, वाळू आधी बिल्डिंग मटेरियलच्या साहित्याच्या उत्खननास तात्पुरत्या स्वरूपात परवानगी द्यावी. याचबरोबर अनुसूचित जाती घटकातील नागरिकांना पाच ब्रास वाळू मोफत देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.
सदर आंदोलनाची महसूल प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दीपक चंदनशिवे यांनी दिला आहे.


No comments:
Post a Comment