वाकी शिवणे येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो 9112049614
सांगोला तालुक्यातील विठू माऊली दुध संघ वाकी शिवणे येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता वाकी शिवणे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत शिंदे यांनी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास डॉ रमेश सिद यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी बबन घाडगे, संतराम होवाळ, दादासाहेब जाधव,मधुकर पाटील,मारुती होवाळ,संजय सोनलकर,मंगेश सुरवसे, छगन होवाळ, खंडु शिरतोडे, नितीन होवाळ, लहु राजगुरू,प्रशांत ऐवळे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते


No comments:
Post a Comment