अखेर शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाला यश
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
जिल्हा परिषदेकडून कार्यकारी अभियंता दीपक कोळी कार्यमुक्त
सोलापूर (प्रतिनिधी):- 23 जानेवारीपासून शेतकरी कामगार पक्षाने व पक्षाच्या सांगोला तालुक्यातील 45 गावच्या सरपंचांनी जे आंदोलन केले त्याला काल सोमवार दि.13 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेने कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाला यश आले असल्याची माहिती भाई बाबासाहेब करांडे, भाई बाळासाहेब काटकर, भाई संतोष देवकते, भाई गजेंद्र कोळेकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे उपअभियंता सुनील कटकधोंड यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा काल सोमवारी पदभार घेतला. यापूर्वी त्यांनी 2 वर्ष हा पदभार सांभाळला आहे. तसेच बांधकाम कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार पाहिला आहे. आजपर्यंत कार्यकारी अभियंता पदावर केलेल्या कामाच्या जोरावरच त्यांनी पुन्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार मिळवला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 1019 ग्रामपंचायत आहेत, जलजीवन मिशनचा सुरुवातीला 946 गावांचा आराखडा तयार करण्यात आला. नंतर 855 गावांचा सुधारित आराखडा तयार झाला. सर्व 855 कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. आता 178 कामे नव्याने करण्यात येणार असून त्याला मार्च अखेर प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देणार आहे.
जिल्ह्यातील टंचाईचे आव्हान असते. जिल्ह्यातील 30 पैकी 20 प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. त्या योजना सोलर युनिटचा वापर करून सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
एप्रिल ते जूनमध्ये जिल्ह्यातील 240 गावे टंचाई बाधित होऊ शकतात, त्यासाठी 161 टँकर व 103 विहिरी अधिग्रहण करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. नमामी चंद्रभागा अभियानावर फोकस राहणार आहे. नदी काठची जी गावे आहेत, त्यागावातील दूषित पाणी नदी जाऊ नये यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट उभारण्यासाठी प्रयत्न राहील. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे उपस्थित होते.
बेकायदेशीर असलेल्या प्रशासकीय कामाला आम्ही विरोध केला आहे. अशी जर कामे झाली तर जनतेचे सेवेचे मूळ ध्येय त्या लोकांना पाणी मिळणार नाही. स्व.आबासाहेबांनी प्रयत्न करुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 81 गावाची पाणीपुरवठा योजना 2003 साली सुरु केली. ती आजही निकोपपणे चालू आहे. हीच पारदर्शकता जलजीवनच्या कामात असावी असा शेकापक्षाचा आग्रह आहे. कुणीही या कामामध्ये दुर्लक्ष करुन जनतेचे नुकसान केले तर आपला असो किंवा परका त्याला शिक्षा भोगावीच लागेल असा शेकापचा प्रयत्न असून मी आरपारची लढाई लढत असतो. माझ्याकडून कधीही तडजोड केली जाणार नाही. ही शिकवण आबासाहेबांनी मला दिली असून मरण पत्करेन पण जनतेची द्रोह करणार नाही.
भाई डॉ.बाबासाहेब करांडे


No comments:
Post a Comment