रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटना आक्रमक; कर्जदाराला मदत करण्यासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - गणेश जुगदर
महूद /प्रतिनिधी
महूद(ता.सांगोला)येथील एका थकित कर्जदाराच्या स्थावर मिळकतीची बँकेने लावलेले लिलावाची नोटीस ही बेकायदेशीर असून कर्जदार हा बँकेचा एक रुपयाही देणे लागत नाही. कर्जदाराला आत्महत्या करण्यास बँकेने प्रवृत्त केलेले आहे.त्या कर्जदाराला मदत करण्यासाठी आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असे मत शेतकरी संघटनेचे नेते गणेश जुगदर यांनी सांगितले.
तसेच सदर शेतकरी कर्जदाराने आत्महत्या करू नये. त्यांना सहानुभूती देण्यासाठी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटना अशा शेतकरी कर्जारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. तसेच मंत्र्यांनी,आमदार,खासदार यांनी उद्योगधंद्यासाठी कर्ज घेतल्यानंतर त्यांचे कर्ज एन.पी.ए मध्ये गेल्यास त्यांना पतसंस्था,बँका सहा ते दहा वर्षांनी मुद्दलावर मिटवतात आणि सर्वसामान्य कर्जदार एनपीए मध्ये गेल्यास त्याचा जाहीर निलाव काढला जातो. म्हणजे येथे लोकशाही फक्त आमदार खासदारांना आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. हा अन्याय आहे.
तसेच यापुढे बोलताना ते म्हणाले की,बँका कोणत्याही कर्जाचा विमा उतरवून घेत नाहीत. बँकेने सदर कर्जदारांची फसवणूक केलेली आहे.८ तारखेला होणार लिलाव शेतकरी संघटना उधळून लावणार आहे.व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. या सरकारने आमचे प्रश्र्न ऐकून घ्यावे.तसेच या तालुक्यातील आमदार साहेबांनी देखील आमचे ऐकून घ्यावे.आणि हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करावा अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
तसेच जर आमदार साहेबांनी हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला नाही. तर आमदार साहेबांच्या घरी शेळी,मेंढी सहित हा मोर्चा नेला जाईल.बेकायदेशीर वागणाऱ्या बँकांना कायद्याने वागावे असा इशारा यावेळी शेतकरी नेते गणेश जुगदर यांनी केला. तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी शेतकऱ्यांना केले. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:
Post a Comment