आदर्श मुख्याध्यापक रेवन अवताडे तर आदर्श शिक्षक पुरस्कार दिगंबर हेगडे यांना मिळाल्याबद्दल नारायण काटकर यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्या वतीने मा श्री रेवन शिवाजी अवताडे सर यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार तर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मा दिगंबर सुखदेव हेगडे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाकी शिवणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण काटकर यांच्या शुभहस्ते अवताडे सरांचा सत्कार करण्यात आला व श्री दिगंबर हेगडे सरांचा सत्कार किसन काटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला व त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या या शिक्षकांना पुरस्कार मिळाल्यामुळे वाकी शिवणे गावातील नागरिकाकडून त्यांचे कौतुक व स्वागत केले जात आहे आहे


No comments:
Post a Comment