धाराशिव साखर कारखाना लि. युनिट ४ वाकी शिवणे बॉयलर अग्नी प्रदीपन व मोळी पूजन कार्यक्रम समारंभ
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला प्रतिनिधी धाराशिव साखर कारखाना लि युनिट ४ सांगोला सहकारी साखर कारखाना वाकी शिवणे तालुका सांगोला बॉयलर अग्नी प्रदीपन व मोळी पूजन कार्यक्रम समारंभ शनिवार दिनांक 8 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा शहाजीबापू पाटील, माजी आमदार विधानपरिषद दीपकआबा साळुंखे पाटील, शे का प युवा नेते मा डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते होणार आहे व होम हवन पूजा सौ सुरेखा श्री धनाजी ज्ञानेश्वर खरात व तसेच मोळी पूजन सौ कलावती श्री तुकाराम नारायण कुरे यांच्या शुभहस्ते होणार आहे व तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा अभिजीतआबा धनंजय पाटील चेअरमन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना ली वेणूनगर गुरसाळे व तसेच मा अमर धनंजय पाटील कार्यकारी संचालक धाराशिव सहकारी साखर कारखाना व सर्व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी या शुभप्रसंगी उपस्थित राहणार आहेत


No comments:
Post a Comment