सांगोला येथे ४८ लाखांचा गुटखा जप्त
सांगोला / प्रतिनिधी
कर्नाटक (जत) मधून औरंगाबादकडे बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक रात्र गस्तीवर असणाऱ्या सांगोला पोलिसांनी पकडला. या कारवाईत १२ लाखाचा ट्रक व त्यामधील ४८ लाख ११ हजाराचा गुटखा असा एकूण ६० लाख ११ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई दि. २५ रोजी पहाटे ३.३० दरम्यान सांगोला बायपास रोडवर करण्यात आली.
पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी. प्रशांत हुले, पो.ना. राहुल कोरे, नितीन बंगाळे, नितीन घुले, दत्तात्रय काटे, गणेश कुलकर्णी रात्र गस्तीवर होते. दरम्यान, पहाटे ३.३० च्या दरम्यान कर्नाटक (जत) येथून पंढरपूरकडे भरधाव वेगाने जाणारा मालट्रकचा संशय आल्याने सांगोला येथे नवीन बायपास रोडवर तो पकडण्यात आला. यावेळी ट्रकचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी सांगोला पोलीस स्टेशनला भेट देऊन पकडलेल्या गुटख्याची माहिती घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना केल्या. यावर अन्न व भेसळ सुरक्षा अधिकारी यु.एस. भूसे यांनी १२ लाख रुपये किमतीचा ट्रक क्र. एन.आर. १९/जी.सी. ८००७ व त्यामधील १५० पोती हिरा गुटखा, ७५ पोती रॉयल सुगंधी तंबाखू, ९८ पोटी बाबाजी पान मसाला व ५० पोती २२० सुगंधी तंबाखू एकूण ३७३ पोती असा एकूण ६० लाख ११ मुद्देमाल जप्त केला आहे.


No comments:
Post a Comment