Recent Tube

Breaking

Wednesday, September 28, 2022

चिंचोली येथे होणारा बायोगॅस प्रकल्प कारखाना बंद करावा अन्यथा 3 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर जनावरासहित मोर्चा काढणार


चिंचोली येथे होणारा बायोगॅस प्रकल्प कारखाना बंद करावा अन्यथा 3 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर जनावरासहित मोर्चा काढणार

सांगोला प्रतिनिधी: चिंचोली तालुका सांगोला येथे होणारा बायोगॅस प्रकल्प कारखाना बंद करावा या मागणीसाठी चिंचोली ग्रामस्थ तसेच शेतकरी, महिला यांच्यासह जनावरे यांचा सांगोला तहसील कार्यालयावर सोमवार दिनांक 3 रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनाद्वारे सांगितले आहे.

चिंचोली तालुका सांगोला येथील गट नंबर 632/2 मध्ये होणारा बायोगॅस प्रकल्प कारखाना हा बागायत क्षेत्रात येत असून सदर प्रकल्पामुळे वापरणाऱ्या घातक रसायन, विषारी केमिकल वापरामुळे परिसरातील शेतकरी जनावरे यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या जनावरांच्या व तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत परिणाम होणार असून सदर प्रकल्पामुळे पर्यावरणाची ही मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे.

तत्पूर्वी सदर कारखाना प्रकल्प सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. यावर गावातील नागरिकांचा विरोध झाल्यानंतर यावर ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेऊन सदर परवानगी ला विरोध आल्याने ग्रामसभेने दिलेली परवानगी रद्द केली आहे. या पुढील काळात देखील ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ शेतकरी महिला नागरी जनावरांचा या प्रकल्पाला विरोध राहणार असल्याने हा प्रकल्प गावांमध्ये उभा राहू नये अशी मागणी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.   

सदर प्रकल्प कारखाना बंद न झाल्यास चिंचोली ग्रामस्थ, शेतकरी, महिला यांच्यासह जनावरे घेऊन सोमवार दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी सांगोला तहसील कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदन देतेवेळी काँग्रेस कमिटी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील  माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बेहरे, माजी सरपंच कृष्णा बेहरे, माजी सरपंच लक्ष्मण बेहरे, माजी सरपंच मारुती बेहरे, चेअरमन दादासाहेब माने यांच्यासह गावातील शेतकरी, नागरिक, महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment