रयत’शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड
सांगोला प्रतिनिधी
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांची रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याचे पत्र नुकतेच संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख हे उच्च विद्याविभूषित असून माजी आमदार (स्व.) भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. आजोबांचा वारसा चालवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वैद्यकीय व्यवसायाकडे दुर्लक्ष करून सांगोला तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी पूर्णवेळ उपस्थित राहुन जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत असतात.
सर्वसामन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत तत्पर असतात. (स्व.) माजी आमदार आबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा मी मनापासून प्रयत्न करीत आहे.त्यांच्या कृपाशीर्वादामुळेच माझी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.तसेच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे काम मी रयत शिक्षण संस्थेत यापुढे अविरतपणे सुरू ठेवीन, असे मत रयत शिक्षण संस्थेचे नूतन जनरल बॉडी सदस्य डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले आहे.


No comments:
Post a Comment