वाकी शिवणे विद्यामंदिर हायस्कूल येथे स्व मा आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्याचे लोकनेते स्व मा आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विद्यामंदिर हायस्कूल वाकी शिवणे मध्ये भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जीवनातील व राजकारणातील विचार मारुती आलदर, गाडे सर, बाळासाहेब काटकर, येलपले सर, यांनी सांगितले.
व प्रशालेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वृक्षारोपण, सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने युवक वर्ग उपस्थित राहून रक्तदान केले. या कार्यक्रमास डॉक्टर रमेश सिद, नामदेव सिद, कोंडीबा सिद. नारायण काटकर. पांडुरंग सिद. मुख्याध्यापक रेवन अवताडे. ग्रामविकास अधिकारी शहाजी इंगोले. काशिलिंग आलदर. प्रल्हाद सिद. खंडागळे सर. व तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


No comments:
Post a Comment