डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी आनंद दौंडे तर कार्याध्यक्षपदी शशिकांत बनसोडे यांची निवड
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुका कार्यकारणीची निवड संपन्न झाली या निवडीमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी एस एफ न्यूज चॅनलचे संपादक आनंद दौंडे कार्याध्यक्षपदी शशिकांत बनसोडे उपाध्यक्ष सिद्धेश्वर माने व मोहसीन मुलानी तसेच सचिव पदी पांडुरंग पाटील सहसचिवपदी संतोष साठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ही निवड जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या निवासस्थानी संपन्न झाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत यांनी उपस्थित संपादक आणि पत्रकार यांना मार्गदर्शन केले प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबतच आता डिजिटल मीडियाही त्यांची भूमिका बजावत आहे समाजातील वेगवेगळे प्रश्न डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मांडले जात आहेत डिजिटल मीडियातील संपादक आणि पत्रकार संघटित राहावेत आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन पातळीवर एकत्रितपणे पाठपुरावा करता यावा यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार
संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले तसेच डिजिटल मीडियामधील सर्व संपादक पत्रकारांना एकत्रित करून संघटनेचे बळ वाढवण्यात येत आहे प्रत्येक तालुक्यात नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत सांगितले यावेळी संतोष साठे उमेश मंडले शशिकांत बनसोडे संजय बाबर किशोर संजय माने चंद्रकांत आयवळे शुभम आयवळे पांडुरंग पाटील जगन्नाथ साठे सुनील वाघमोडे विकास वाघमारे रोहित सूर्यागण अमोल महारनवर यासह डिजिटल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते


No comments:
Post a Comment