Recent Tube

Breaking

Friday, November 28, 2025

उच्चशिक्षित अपक्ष उमेदवार विश्वेश झपके नगरपालिकेत आणतील विकासाचे नवे मॉडेल

 


उच्चशिक्षित अपक्ष उमेदवार विश्वेश झपके  नगरपालिकेत आणतील विकासाचे नवे मॉडेल

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.शिवसेना एका बाजूला तर  भारतीय जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष व दीपक आबा साळुंखे पाटील गट दुसऱ्या बाजूला तर अपक्ष उमेदवार विश्वेश झपके एका बाजूला निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.सध्या सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सभा झाली.

 तर निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांची सभा होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रचार सभेचे आयोजन केले असले तरी उच्चशिक्षित उमेदवार विश्वेश झपके निश्चितपणे नगरपालिकेच्या विकासाचे नवे मॉडेल आणणार असल्याची चर्चा सांगोल्यात रंगू लागली आहे.

  नगराध्यक्ष पदासाठी असणाऱ्या अकरा उमेदवारांपैकी केवळ दोनच उमेदवार पक्षाच्या चिन्हावरती लढत आहेत, बाकीचे अपक्ष उमेदवार आपापल्या परीने आपले नशीब आजमावत आहेत. या अपक्ष उमेदवारांपैकी विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांनी निवडणुकीच्या प्रचारात विशेष आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे. प्रभाग निहाय केलेलं उत्कृष्ट नियोजन त्याचबरोबर प्रत्येक घरी जाऊन डेमो मतपत्रिका दाखवणे व विकासाचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांची यंत्रणा सक्षम ठरत आहे.

 सध्या सांगोला शहरातीमध्ये  जिकडे जाईल तिकडे केवळ आणि केवळ प्रचाराचेच आवाज घुमत आहेत. विविध ठिकाणी कॉर्नर सभांचे आयोजन होत आहे.यामध्ये  उच्चशिक्षित उमेदवाराला सांगोले करांची जास्त पसंती असल्याचे बोलले जात आहे.यामध्ये प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली अपक्ष म्हणून उभा असणारे त्यांचे चिरंजीव विश्वेश झपके यांनी विकासाच्या विविध संकल्पना मांडल्या आहेत. राज्यातील एक आदर्श नगरपरिषद कशी असावी हे सांगोला नगर परिषदेत असणाऱ्या विविध वाड्या वस्त्यांवर, विविध ठिकाणच्या कॉलनीमध्ये, उपनगरांमध्ये  प्रत्यक्ष भेट देऊन पटवून देत आहेत. 

त्यामुळे विकासाच्या विविध संकल्पना सत्यात उतरू शकतात हे मतदारांनी जाणले आहे. त्यामुळे त्यांच्या  सर्जनशील विचाराचे प्रत्येक ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपात स्वागत होत आहे. त्यांना घरोघरी औक्षण  केले जात आहे.

 *चौकट* -विकासाचे पक्के नियोजन करून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरलेले विश्वेश झपके यांनी प्रचारात विशेष आघाडी घेतली आहे. विश्वेश झपके यांची बहीण प्रार्थना बिज्जरगी- झपके यांनी आपल्या भावासाठी निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठ्या जोमाने प्रचारात सहभागी होत आहेत. विविध ठिकाणी जाऊन सांगोला नगर परिषदेच्या विकासाचे नवे धोरण लोकांपर्यंत पोहोचवत आहेत, सांगोला शहरात अर्धवट राहिलेले कामांना गती देण्यासाठी एक शिक्षित उमेदवार कशा पद्धतीने कार्यपद्धती राबवू शकतो याची माहिती लोकांपर्यंत त्या पोहोचवत आहेत. सांगोल्याच्या शाश्वत विकासासाठी   येत्या दोन तारखेला एअर कंडिशनर  या चिन्हासमोरील बटन दाबून माझा भाऊ विश्वेशदादा झपके यांना विजयी करा असे  भावनिक आवाहन करत बहिणीची  प्रचारातील ही आघाडी निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास वाटतो.

No comments:

Post a Comment