Recent Tube

Breaking

Sunday, October 19, 2025

लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नामुळे पुरग्रस्तांना ८९ कोटींचा निधी मंजूर

 


लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नामुळे पुरग्रस्तांना ८९ कोटींचा  निधी मंजूर

  

  राज्यामध्ये परतीच्या पावसाने हा‌-हा कार माऊलीला या पावसामुळे राज्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावरील उभी पिके वाहून गेली.अनेकांच्या जमीनी सुध्दा वाहुन गेल्या आहेत.सोलापुर जिल्ह्यातील नद्यांना महापुर आल्याने अनेक गावांना पुराचा फटका बसला.अनेकांची घरी ,जनावरे उभी पिके वाहुन गेली.अनेक कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हालवण्यात आले होते.सांगोला तालुक्यातील काही भागांचे मोठे नुकसान झाले आहे.

    सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहाणी केली.व‌ काही कुटुंबांना प्राथमीक मदत देण्याचा प्रयत्न केला.ज्या दिवशी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता आमदार साहेब बाधीत कुटुंबांना मदत करण्यासाठी तातडीने त्या त्या भागात पोहचले होते.

   आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून सदर नुकसानीची पाहाणी करुन पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या होत्या.तसेच आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सदर नुकसानीची माहिती दिली व सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीचे, घरांचे तसेच रस्त्यांचे ,पुलाचे व इतर नुकसानीची इत्यंभुत माहीती मुख्यमंत्री साहेबांना दिली व नुकसानग्रस्त नागरीकांना योग्य ती मदत करण्याची मागणी केली‌ होती तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या कडे सुध्दा पाठपुरावा केला होता.मा.मुख्यमंत्री  साहेबज्ञव पालकमंत्री साहेब यांनी आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार केरुन योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले गेले होते.

  राज्य सरकारने संपुर्ण राज्यातील पुग्रस्तांना मदत जाहीर केली त्यामध्ये आपल्या सांगोला तालुक्यासाठी जवळ जवळ ८९ कोटीं रुपये पुग्रस्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला व‌ सततच्या पाठपुराव्यामुळे आज शेतकऱ्यांना दिलासा मिळला आहे .आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या कामाचे कौतुक संपुर्ण मतदार संघातील नागरीकांकडुन होताना दिसत असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

No comments:

Post a Comment