Recent Tube

Breaking

Friday, October 17, 2025

न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज सांगोला व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची घेतली शपथ..



न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज सांगोला व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची घेतली शपथ..


  तालुका प्रतिनिधी : न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा संतोष राजगुरू यांच्याकडून फटाके मुक्त दिपावली साजरी करण्याची शपथ देण्यात आली.


 यामध्ये विद्यार्थ्यांनी दीपावली साजरी करत असताना फटाके न फोडता ती साजरी करावी, कारण फटाक्यामुळे होणारे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व त्यामुळे पर्यावरणाचा बिघडणारा समतोल व त्याचे होणारे दुष्परिणाम याचा उल्लेख करण्यात आला.

 तसेच या प्रदूषणामुळे लहान बालके, रुग्ण, वृद्ध माणसे यांना होणारा त्रास व त्यामुळे त्यांचे धोक्यात येणाऱ्या आरोग्य व निर्माण होणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी कोणतेही प्रदूषण न करता तसेच इतरांनाही त्यापासून परावृत्त करून निसर्गाच्या सानिध्यात राहून आनंदाने दीपावली साजरी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले व त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 


   यावेळी संस्था सदस्य प्रा. डॉ.अशोकराव शिंदे, प्रा. दीपक खटकाळे, प्रा. जयंत जानकर,ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रा केशव माने उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment