संकटकाळी मी खंबीरपणे जनतेच्या पाठीशी ---आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
जवळा,घेरडी मंडलाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्याच्या सुचना आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्याने जवळा व घेरडी मंडलाचा समावेश अतिवृष्टी मध्ये करण्यात आला आहे.शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला आहे.आपला सांगोला तालुका हा परंपरेने दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.एवढ्या पावसाची आपल्याला सवय नाही. सरासरीपेक्षा एवढा जादा पाऊस पडला की..उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत.ऊस,मका,केळी ,डाळींब व पालेभाज्या यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आसुन.अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे.पशुधन नाहीसे झाले आहे.रस्ते व रस्त्यांवरील पुलांचे अतोनात नुकसान झाले आसुन. पिकांबरोबर ईतर ही नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत.
आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील नागरीकांना दिलासा देताना सांगितले की..
सांगोला विधानसभा मतदारसंघातील एकाही गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही तशा सुचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
माझ्या मतदार संघातील नागरीकांना कुठल्याही प्रकारचे संकट आले तर मी खंबीरपणे सदैव तुमच्या पाठीशी आसल्याचे आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले



No comments:
Post a Comment