आलदर हॉस्पिटलच्या वतीने नवरात्री महोत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिर
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील नामवंत आलदर हॉस्पिटलच्या वतीने नवरात्री महोत्सव निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 1आक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसेवाडी कमलापूर येथे या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे.
या शिबिरामध्ये जन्मलेल्या बाळापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत रुग्ण मोफत तपासले जातील व त्या बरोबर रुग्णांना मोफत औषधे दिली जातील.
व तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातील.
तरी सांगोला तालुक्यातील रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आव्हान सांगोला तालुक्यातील आलदर हॉस्पिटल चे नामवंत बालरोग तज्ञ डॉ महावीर आलदर यांनी केले




No comments:
Post a Comment