Recent Tube

Breaking

Sunday, September 7, 2025

स्थानिक लोकप्रतिनिधींना कार्यक्रमासाठी निमंत्रण न दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी; एस.टी. आगाराच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह



स्थानिक लोकप्रतिनिधींना कार्यक्रमासाठी निमंत्रण न दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी; एस.टी. आगाराच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह


सांगोला राज्य परिवहन एस.टी. आगाराने नुकत्याच शनिवार दिनांक ६/९/२०२५ रोजी आगारा मार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधींना निमंत्रण न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या घटनेमुळे आगाराच्या कार्यशैलीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि समन्वयावर शंका घेतली जात आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी हे मतदारसंघातील जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असून, त्यांना अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेणे अपेक्षित आहे. मात्र, एस.टी. आगाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “लोकप्रतिनिधींना निमंत्रण न देणे म्हणजे जनतेच्या भावनांचा अनादर आहे. आगाराचे अधिकारी नेमके काय लपवत आहेत?” असा सवाल स्थानिक रहिवासी यांनी उपस्थित केला आहे.

काही नागरिकांनी यामागे प्रशासकीय हलगर्जीपणा किंवा राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेमुळे आगाराच्या व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत स्थानिक एस.टी. आगाराचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतेही ठोस उत्तर देण्यास नकार दिला. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निमंत्रण न देण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेण्यात आला असला तरी यामागे अधिकारी वर्गावर राजकीय दबाव असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.

या प्रकरणी नागरिकांनी आगार प्रशासनाकडून त्वरित खुलासा करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

No comments:

Post a Comment