मानगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा महूद यांच्यावतीने आज मोठ्या उत्साहात श्रींची आरती व शिक्षक दिन साजरा.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला प्रतिनिधी :- मानगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक सांगोला शाखा महूद येथे आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.व आजची श्रींची आरती युवा नेते मा.दिग्विजय दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सांगोला तालुक्याचे युवा नेते मा.श्री.दिग्विजय दादा पाटील, मानगंगा परिवार चे संचालक श्री.सचिन इंगोले साहेब, श्री.विजयजी वाघमोडे साहेब, श्री.विवेकजी घाडगे सर, संस्थेचे मार्गदर्शक श्री.गुरुदेव येडगे गुरुजी, श्री.दर्याबा येडगे सर, श्री.संजय सर, श्री.जाधव सर, श्री.येलपले सर तसेच मान्यवर शिक्षिका सौ.जया वाघमोडे मॅडम, सौ.जनाबाई कारंडे मॅडम, सौ.संजीवनी निंबाळकर मॅडम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
शिक्षण दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मानाचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांचे समाजातील योगदान व विद्यार्थ्यांच्या जडण - घडणीतली त्यांची भूमिका अधोरेखित करत पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अक्षय मुढे साहेब, महूद शाखेचे व्यवस्थापक मा.महेंद्र लवटे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानगंगा परिवाराच्या वतीने सर्व मान्यवर शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.



No comments:
Post a Comment