Recent Tube

Breaking

Wednesday, September 3, 2025

आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक सचिन नारनवर यांची महीमच्या सरपंचपदी निवड



आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक सचिन नारनवर यांची महीमच्या सरपंचपदी निवड


   आज महिम गावच्या नुतन सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते व आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक मा.सचिन नारनवर यांची निवड संपन्न झाली.

   महिम गावची सरपंच पदाची निवड ही कयदेशीर रीत्या स्थगित करण्याचा प्रकार झालेला होता .एक युवा नेता सरपंच होत असताना काही विरोधी मंडळींनी जाणुन बुजून सरपंच पदाची निवडणूक लांबवली होती.

  आज आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कायदेशीर बाबींचा निपटारा करीत आज महिम गावाला सचिन नारनवर यांचा सारखा युवा सरपंच मिळालेला आसुन.आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या योग्य त्या मार्गदर्शनाखाली सचिन नारनवर यांची झालेल्या निवडीमुळे महिम गावातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले त्यांच्या निवडीचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता .सदर निवड पार पाडण्यासाठी महिम गावातील शेतकरी कामगार पक्षाचे तसेच पुरोगामी युवक संघटनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह परंपरागत हितचिंतकांनी  प्रयत्न केले असल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

No comments:

Post a Comment