खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची केली पाहणी
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
करमाळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिना-कोळगाव धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने तसेच आष्टी तालुक्यातील साकतचे तळे फुटल्यामुळे करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले.
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे. तसेच सीना नदीवरील बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बिटरगावश्री, खडकी बंधारा, तरडगाव बंधारा, संगोबा बंधारा, निलज, कोर्टी आदी भागांतील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी खासदार मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सरसकट शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.




No comments:
Post a Comment