मराठा आंदोलनास जाणाऱ्या मराठा बांधवांना भीमसैनिक आकाश दादा आठवले यांच्याकडून मदतीचा हात.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षण महामोर्चास आझाद मैदान मुंबई येथे सांगोला तालुक्यातून जाणाऱ्या मराठा बांधवांना सांगोला तालुक्यातील सामाजिक नेते व भीमसैनिक आकाश दादा आठवले यांच्याकडून भडंग, चिवडा, शेंगदाणे यांची पाकीटे व दोन दिवसासाठी 1000 बाजरीच्या भाकरीची सोय करण्यात आली आहे.
आकाश दादा आठवले यांच्या या योगदानाबद्दल सांगोला तालुक्यातील मराठा समाज बांधवाकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
या मराठा समाजाच्या आंदोलनाला जाणाऱ्या मराठा बांधवांना आकाश दादा आठवले यांनी मदत केल्यामुळे यातून सामाजिक एकोपा दिसून येत आहे.



No comments:
Post a Comment