Recent Tube

Breaking

Saturday, July 19, 2025

केवळ पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी स्थापन झालेली देशातील पहिली संस्था प्रतिबिंब प्रतिष्ठान




केवळ पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी स्थापन झालेली देशातील पहिली संस्था प्रतिबिंब प्रतिष्ठान


चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला शब्द पाळला; पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी सहाय्यास प्रारंभ


संस्थापक राजा माने यांची माहिती


"महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी तसेच मुला-मुलीच्या करिअरसाठी सहाय्य करणारी संस्था स्थापन करा, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आपण करु! ",असा शब्द राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कणेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी दिला होता.त्या शब्दास अनुसरुन प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी पूर्ण पाठबळ त्यांनी दिले आणि आता राज्यातील पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी तसेच कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष मदत देण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली.

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष असलेल्या राजा माने यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले. राज्यातील गरजू पत्रकारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव दीपक नलावडे, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,राज्य संघटक तेजस राऊत, राष्ट्रीय सहसमन्वयक मुरलीधर चव्हाण, मुंबई शहर कार्याध्यक्ष शशिकांत देशमुख ,पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत कटारे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक राजाराम मस्के ,सोलापूर शहराचे अध्यक्ष परशुराम कोकणे आदी उपस्थित होते.खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करून एका कागदावरील अर्ज व्हॉट्सअँप द्वारे 8668343024 या नंबरवर पाठवावा.

No comments:

Post a Comment