Recent Tube

Breaking

Saturday, July 19, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन - जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन - जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत 


सांगोला (तालुका प्रतिनिधी): राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. 

      राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी प्रत्येक मंडलात बैठका घेऊन नियोजन केले आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, विविध मोर्चा, आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment