वाखरी ता. पंढरपूर येथे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिताताई देशमुख यांनी केली वारकरी बांधवांची सेवा.
वारकरी बांधवांच्या आरोग्याची तपासणी करुन जपली सामाजिक बांधिलकी
सांगोला(प्रतिनिधी):-आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. पायी वारीत वारकर्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी वाखरी ता.पंढरपूर येथे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिताताई देशमुख यांनी पुढाकार घेऊन वारकरी बांधवांच्या आरोग्याची तपासणी करुन सामाजिक बांधिलकी जोपासत सर्वापुढे एक आदर्श निर्माण केला. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम वारकर्यांची मने जिंकणारा ठरला.
राजकारणापेक्षा समाजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी यांनी स्थान मिळविले आहे. नागरिकांच्या सोयी-सुविधांसोबतच त्यांच्या आरोग्याचीही ते काळजी घेत असतात. त्याचदृष्टीने वाखरी येथे पंढरीत जाण्यापूर्वी थकलेल्या भाविकांची सेवा व वारकर्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिता ताई बाबासाहेब देशमुख यांनी वारकर्यांना कोणताही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने आरोग्याची विचारपूस करुन तपासणी केली. यावेळी त्यांनी अनेक वारकरी बांधवांच्या आरोग्याची तपासणी करुन, औषधे देण्यात आली. यावेळी पायी चालण्यामुळे वारकर्यांना होणारे स्नायू विकार, ताप, थकवा, डोकेदुखी, पायांची सूज अशा तक्रारींसाठी तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले.
खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीची वाट चालणार्या हजारो वारकर्यांची आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिता ताई देशमुख यांनी तपासणी केली. 11 वेळा आमदार असणार्या व अत्यंत साधेपणा जपलेल्या स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा प्रथमच आमदार झालेले डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकीताताई देशमुख हे आपल्या कार्यातून पुढे चालवित असल्याचे उपस्थित वारकरी बांधवांमधून बोलले जात होते. ‘न भुतो’.. असा हा उपक्रम निश्चितच वारकर्यांची खर्या अर्थाने आरोग्य सेवा देणारा ठरला आहे.





No comments:
Post a Comment